BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

Sunday, September 16, 2018

पितळखोरा बुद्ध  लेणी 













एक अर्धविकसित तथा सद्या दुर्लक्षित असलेली लेणी समूह । । । ।
आज औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरा बुद्ध  लेणी बघण्याच्या योग आला.अतिशय निसर्गरम्य अश्या वातावरणात ही लेणी आहे. पावसाळ्यात ह्या लेणीला भेट देणे थोडे जिकारीचे आहे. कारण ह्या लेणीला जाण्यासाठी एका छोट्या वेगवान पाण्याच्या ओढ्याला पार करून जावं लागते.
पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यां पेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते.
     या लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत.       भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चितारलेले, सजवलेले आहे. मुंडन केलली मुले व बुटक्या मूर्ती गुढघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात. (या चित्रांचा काल गुहेपेक्षा अर्वाचीन दिसतो.) चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्व प्राप्त करून घेतले आहे.
पितळखोरा लेणी ला जाणे थोडे जिकारीचे आहे।। संपूर्ण जंगलमय परिसर आहे।। मनुष्यवस्तीपासून खूप दूर आहे।।एका छोट्या वेगवान ओढ्याला पार करून जावे लागते। इथे पर्यटकांचा बिलकुल वावर नसतो।केवळ एक सुरक्षा रक्षक असतो।।आम्ही भेट दिली तेव्हा आम्हा तीन भन्ते व्यतिरिक्त कुणीच नव्हते।।जाताना ग्रुप करून जाणे जास्त सोयीचे होईल
- ऐतिहासिक वारसा असलेल्या पितळखोरा लेणींचे नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान होत असून लेणी नामशेष।   होण्याच्या मार्गावर आहेत. पुरातत्त्व विभाग, वन विभाग व पर्यटन विभाग यांच्या दुर्लक्षाने लेणीची दुरवस्था झाली असून शासनाने याकडे लक्ष देऊन लेणीचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे।
कन्नडपासून 20 किलोमीटर अंतरावरील डोंगरात पितळखोरा लेणी आहे. येथील लेणी इसवी सन पूर्व पहिल्या, दुस-या व तिस-या शतकात कोरल्या गेल्या आहेत. अजिंठा व वेरूळ लेणींच्याही पूर्वीची पितळखोरा लेणी असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. लेणी क्र. एक ते नऊ मधील बराचसा भाग शेवटची घटका मोजत आहे.
पुरातत्त्व विभागाने पुढाकार घ्यावा
- महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन लेणींमध्ये पितळखो-यातील चैत्यगृहाची गणना होते. चैत्यगृहात पुरातन चित्रकलेचे अनेक अवशेष आहेत; परंतु अशा अद्भुत कलेच्या वस्तुस्थितीची  माहिती जागतिक पातळीवर होण्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घ्यावा.
पितळखोरा लेणी संवर्धनाची गरज । । ।
पितळखोरा लेणीस संवर्धनाची अत्यंत आवश्यकता असून पितळखोरा येथील प्राचीन बौद्ध लेणीची माहिती आपल्याकडील लोकांना अनेक वर्षांपासून आहे. पुरातत्त्वविषयक ग्रंथांतून अनेकवेळा सविस्तर विवेचन झालेले आहे; परंतु येथील शिल्पांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणे अजूनही शक्य आहे.
पितळखोरा लेणी

औरंगाबाद-चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबादपासून कन्नड हे अंतर ६० कि.मी. आणि त्यापुढे पितळखोरा २० कि.मी. भरते. अत्यंत सुंदर आणि प्राचीन बौद्ध लेणी पाहायला पितळखोरा या ठिकाणी गेलेच पाहिजे. हे जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने संरक्षित केलेले आहे. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकामध्ये खोदलेली हीनयान पंथाची ही लेणी आणि तो सगळा परिसरच अत्यंत नयनरम्य आहे. गौताळा अभयारण्यात हा भाग येतो. लेण्यांमध्ये जाण्यासाठी उत्तम बांधलेल्या पायऱ्या आहेत. १४ लेण्यांचा हा समूह असून त्यातील चार चैत्यगृहे आहेत. त्यातील खांबांवर अत्यंत सुंदर रंगवलेली चित्रे आजही शाबूत आहेत. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली ती चित्रे खांबांचे आकार आणि खोदीव स्थापत्य पाहून आश्चर्याने बोटे तोंडात जातात. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून दगडी पन्हाळीचा केलेला वापर आणि ते पाणी थेट खालीपर्यंत नेऊन सोडायची तत्कालीन स्थपतींची दूरदृष्टी केवळ वाखाणण्याजोगी आहे. या लेण्यांच्या समोरील डोंगरामध्ये पण काही खोदीव गुहा असून त्यामध्ये स्तूप आहेत. कदाचित ते कोणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले असावेत.
काल एका धम्म भगिनी ने मला ""लेणी म्हणजे काय"" असं प्रश्न केला।ह्याचे पण स्पष्टीकरण व्हायला पाहिजे।।लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासा–भिक्खूंना तपस्या-साधना-विश्रांती करण्यासाठी केला जाई. लेणी ही प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरली गेली. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत.
लेण्यांमध्ये चैत्यगृहे, विहार व मंदिर यांचा समावेश आहे. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.
लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणार्‍या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे, नाशिक येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यात, ते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख सापडतो.
सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही ब्राह्मणी म्हणजे वैदिक व जैन आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. सातवाहन काल व त्यानंतर परदेशी व्यापार्‍यांशी होणार्‍या व्यापारामुळे आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते
  इतिहास प्रेमी विशेषतः लेणी प्रेमींनी ह्या लेणीला  अवश्य भेट द्यावी....

भन्ते धम्मानंद , मोबा.9511964256