BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

Tuesday, November 26, 2019

जागतिक बौद्ध धम्म परिषद 

22 23 24 नोव्हेम्बर 2019 
औरंगाबाद 
प्रमुख उपस्थिती :- पूज्य दलाई लामा
 कार्यक्रमातील काही क्षण चित्रे 

































----












💐अशोक चक्र व धम्मचक्र प्रवर्तन सुत्त💐

        भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन व पुनीत झालेल्या विविध ऐतिहासिक धम्म स्थळांचा अभ्यास करीत असताना बौद्ध धम्मातील विविध चिन्हे व प्रतीकांचा अभ्यास करणे ,तेवढेच महत्वाचे आहे. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध संस्कृतीमध्ये विविध चिन्हे व प्रतिकांची निर्मिती झाली . सम्राट अशोकानी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर  धम्म प्रचार व प्रसार सोबत या चिन्हांचा व प्रतीकांचा पण प्रचार झाला . स्तूप , चैत्य , हत्ती , घोडा , सिंह , कमळ , बोधिवृक्ष ,पदचिन्ह, भिक्षापात्र , धम्मचक्र , इत्यादी चिन्ह व प्रतिकांच्या माध्यमातून बौद्ध धम्म तत्वज्ञान वा भगवान बुद्धांच्या जीवनातील एखादा प्रसंग प्रदर्शित केला जात असे .
           बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर  सम्राट अशोकानी सारनाथला ,  ज्याला धम्मचक्र प्रवर्तन भूमी म्हणतात , भेट दिली. या स्थळाची पूजा केली . या स्मरणार्थ तथा या भूमीचे धार्मिक महत्व जाणून अशोकानी चार सिंह असलेला एक स्तंभ निर्माण केला . ज्याला आज आपण " अशोक स्तंभ " म्हणतो . अशोक स्तंभ भारत देशाची राजमुद्रा आहे.
 
              हा स्तंभ अशोकानी निर्माण केला.म्हणून त्याला अशोक स्तंभ म्हटले जाते .हा अशोक स्तंभ एका उंच अश्या दगडी पिल्लर वर निर्माण केला गेला.आज त्याची उंची अंदाजे 7 फूट आहे .त्यावर कमळाचे फुल उलटे केल्यावर जसा आकार बनतो त्या आकाराचे शिल्प तयार केले आहे .त्यावर  गोल हर्निका बनवून त्यामध्ये चार प्राणी धावत्या अवस्थेत दिसतात.सिंह , घोडा , हत्ती , बैल हे चार प्राणी आणि प्रेत्येक दोन प्राण्यांच्या मध्ये एक 24 आरेंचा चक्र आहे . त्या 24 आरेंच्या चक्राला "धम्मचक्र" असे म्हणतात.हे चक्र अशोकानी निर्माण केले म्हणून आपण त्याला व्यावहारिक भाषेत अशोक चक्र म्हणतो . पण खऱ्या अर्थने ते धम्मचक्र आहे.
           त्यावर आपल्याला चार सिंह चार दिशेने उभे असल्याचे दिसते.हे चार ही सिंह चार दिशेने गर्जना करीत आहे .मूळ स्तंभात या चार सिंहाच्या वर एक 32 आरेंचे चक्र बनविल्या गेले होते. ते आज ही सारनाथच्या म्युजियम मध्ये आपण पाहू शकतो.अश्या प्रकारे हा स्तंभ अर्थात अशोक स्तंभ आपल्या बौद्ध धम्माचे चिन्ह आहे . ते धम्मचक्राचे प्रतीक आहे.ते धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचे प्रदर्शक आहे. एक बौद्ध म्हणू , अभ्यासक म्हणून या अशोक स्तंभमागील तत्वज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे.

  💐अशोक चक्र :-
 24 आरेंच्या चक्राला अशोक चक्र असे म्हणतात. पण मूलतः ते धम्मचक्र आहे.अशोकानी निर्माण केले म्हणून त्याला अशोक चक्र म्हटले जाते . धम्मचक्र या शब्दात दोन शब्द आहेत - धम्म आणि चक्र । धम्म म्हणजे बुद्धांचा उपदेश आणि चक्र म्हणजे चाक .  आता कुणी म्हणते ते 24 तासांचे प्रतीक आहे . ते पूर्णपणे चुकीचे आहे . कारण अशोकाच्या काळात 24 तास , 12 तास अशी काही पद्धती नव्हती . 24 आरे आणि 24 तास हे फक्त एक योगायोग आहे .  काही ठिकाणी , ह्या चक्रात सत्य , अहिंसा , प्रेम , मैत्री , मानवता इत्यादी 24 शब्द लिहून त्याला प्रदर्शित करतात. परंतु ते पूर्णपणे चुकीचे आहे . ते 24 तत्व  मानवी जीवनात महत्वाचे आहे पण त्यांचा ह्या चक्राशी बिल्कुल संबंध नाही.
          काही ठिकणी असे सांगितले जाते - बुद्धांचे 9 गुण , धम्माचे 6 गुण व संघाचे 8 गुण असे एकूण 24 गुण आहेत . त्यामुळे ह्या चक्रात 24 आरे आहेत. तसे पाहता हे सत्य पण आहे.परंतु जर हे धम्मचक्र आहे तर याचा सम्बन्ध धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताशी आहे. जेव्हा धम्मचक्राचा उपदेश दिला गेला , तेव्हा संघाची निर्मिती झाली नव्हती . धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचा उपदेंश सारनाथ ला दिला गेला .आणि तिथेच अशोकाने ह्या स्तंभाची निर्मिती केली.त्यामुळे अभ्यासक मंडळींनी याचा सखोल विचार करावा .
         धम्मचक्राचा संबंध धमचक्रप्रवर्तन सुत्ताशी आहे .इतर काशाशीही नाही . त्यामुळे धम्मचक्रातील 24 आरे समजून घ्यायचे असतील तर प्रथम आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त वाचावे लागेल. त्याचा अभ्यास करावा लागेल .
धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात , भगवान बुद्धांनी चार आर्यसत्याचा उपदेश केला . आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला .ह्या चारसत्यांना बुद्धांनी स्पष्ट केले आहे . ...
 दुःख आर्यसत्य -
1) जाती पी दुःखा 2) जरा पी दुःखा 3)ब्याधी पी दुःखो 4) मरणम पी दुःखं 5)  अप्पीयेही संपयोगो दुःखो 6 )पियेही विप्पयोगो दुःखो 7)यंपीचेन्न न लाभती तं पी दुकखं 8 ) संखीतेन पंचोपादान खंदा दुःखा अर्थात 5 उपदान स्कंध
7 + 5 = 12

2) दुःख समुदाय आर्यसत्य :- दुःखाचे कारण
         1) काम तन्हा 2 ) भव तन्हा  3)विभव तन्हा
= 3

3) दुःख निरोध आर्यसत्य - अर्थात निब्बान प्राप्त करणे होय
= 1

4 ) दुःख निरोध गामीनी पटीपदा :- आर्य अष्टांगिक मार्ग
       1) सम्मा दिट्टी  2) सम्मा संकप्पो 3)सम्मा वाचा 4)सम्मा कम्म 5 ) सम्मा आजीओ 6) सम्मा सती 7) सम्मा वायमो 8) सम्मा समाधी
= 8

धम्म चक्र प्रवर्तन सुत्तात चार आर्यसत्यांचा उप्पदेश केला आहे . ह्या चार आर्यसत्यांना वरील प्रमाणे 24 प्रकारे स्पष्ट केले आहे .  12 + 3 + 1+ 8 = 24
अश्याप्रकारे चार आर्य सत्याचे प्रतीक असेलेले , धम्म चक्र प्रवर्तन सुत्ताचे प्रतीक असलेलं " चक्र " अशोकानी सारनाथ येथे निर्माण केले . आणि इथूनच सिंह गर्जनेप्रमाणे धम्मचक्राचा उपदेश चारही दिशेने दूर दूर पर्यंत पसरला करिता चार सिंह निर्माण केले . अश्याप्रकारे हा अशोक स्तंभ अर्थात धम्मचक्र आपल्या बौद्ध धम्माचे चिन्ह आहे .प्रतीक आहे.ती देशाची राजमुद्रा आहे .
आपण किती पुण्यवान आहोत की आपण अश्या देशात जन्म घेतला ज्या देशात बुद्धांचा जन्म झाला . ज्या देशाची राजमुद्रा अशोक चक्र आहे . श्रीलंका , थायलँड असे अनेक बौद्ध देशांच्या ध्वजावर पण नाही असे धम्मचक्र आपल्या भारत देशाच्या ध्वजावर आहे .
स्वाभिमान आहे मला मी भारतीय असल्याचा ! स्वाभिमान आहे मला मी बौद्ध असल्याचा !आणि स्वाभिमान आहे मला मी बाबासाहेब आंबेडकरांचा पाईक असल्याचा !
जय बुद्ध ! जय भीम ! जय भारत !
  संकलन - भन्ते धम्मानंद , औरंगाबाद


Sunday, November 24, 2019

दीक्षाभूमीचा सर्वांग इतिहास सांगणारे एक महत्वपूर्ण पुस्तक -- """"दीक्षाभूमी"""" लेखक - शांती स्वरूप बौद्ध , दिल्ली।।
दीक्षाभूमीचा भव्य दिव्य स्मारक बघितल्यावर मनाला जितका आनंद मिळतो तेवढाच त्या स्मारकाचा इतिहास सुद्धा अतिशय संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे।। ह्या पुस्तकाच्या द्वारे दीक्षाभूमी स्मारक निर्मितीचा इतिहास सांगण्यात आला आहे।।
अगदी सुरवातीला धम्मदीक्षा समारंभाचा सादांत इतिहास सांगण्यात आलं आहे।।त्यानंतर डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापर्यंतचा इतिहास स्पष्ट करण्यात आला आहे।।पुस्तकाचा किमान अर्धा भाग हा  धम्मदीक्षेची पार्श्वभूमी , धम्मदीक्षेचा इतिहास व डाँ।बाबासाहेबांचे महापरिनिर्वानाच्या इतिहासानी व्यापलेला आहे।
पुढील भागात दीक्षाभूमी स्मारकाची पार्श्वभूमी विशद करण्यात आली आहे।या  स्मारकासाठी भैयासाहेब आंबेडकर , बै.राजाभाऊ खोब्रागडे , दादासाहेब गायकवाड अश्या अनेक कार्यकर्त्यांना अतिशय संघर्ष करावा लागला। 1961 मध्ये डाँ.सखाराम मेश्राम अध्यक्ष म्हणू व आर आर पाटील सचिव म्हणून एकूण 31 कार्यकर्त्यांची मिळून एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली। नंतर जून 1963 मध्ये, ""परमपूज्य बाबासाहेब डाँ।आंबेडकर स्मारक समिती "" नावानी रजिस्टर करण्यात आली।ह्या वेळी दादासाहेब गायकवाड ह्यांना अध्यक्ष तथा मान.सदानंद फुलझेले ह्यांना सचिव म्हणून निवड करण्यात आली।।( आजपर्यत सदानंद फुलझेले हेच सचिव म्हणून कार्यरत आहे । केवळ रासु गवई यांचे निधन झाल्यामुळे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली )
1961 , तत्कालीन मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण आणि आणि स्मारक समितीतील काही कार्यकर्ते मिळून एक शिष्टमंडळ प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू याना भेटले।।व सर्व विचारविनिमय करून 15 अगस्ट 1961 ला ,स्मारक समितीला एकूण या 14ऐकड जागा हस्तातरीत करण्यात आली।।(1992 च्या विजयादशमीच्या निमित्त तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक ह्यांनी 6 ऐकड जागा दिली। अश्या प्रकारे आज घडीला समितीकडे 20 ऐकड जागा आहे।)
30 मे 1969 ला बुद्ध पौर्णिमेच्या दिनी मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण यांच्या हस्ते दीक्षा भूमी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले।1971 ला दादासाहेब गायकवाड यांचे निधन झाल्यामुळे रासु गवई यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली। ना.ह. कुंभारे ह्यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली।
देशप्रसिद्ध वास्तुशिल्पकार मान. शिवधानमाल ह्यांनी सांची स्तूपाच्या धर्तीवर दीक्षाभूमीचा एक मान चित्र बनविले।व त्यानुसार कामाला सुरुवात झाली।आज जे दीक्षाभूमी स्मारक आपण पाहतो त्याची वास्तुरचना मान. शिवधानमाल ह्यांनी तयार केली आहे।
14 एप्रिल 1991 ला डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म शताब्दी ला स्मारकाचे उदघाटन व्हावे अशी अपेक्सा होती। परंतु ते शक्य झाले नाही।।स्मारक बनायला खूप प्रदीर्घ कालावधी लागला।।18 डिसेंबर 2001 मध्ये राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते स्मारकाचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले.
सध्या दीक्षाभूमी स्मारकाच्या परिसरात भिक्षु निवास , 22 प्रतिज्ञा स्मारक , पवित्र बोधिवृक्ष ,संविधान प्रस्तावना स्मारक इत्यादी स्मारके पाहायला मिळतात.सदरील पुस्तकाच्या माध्यमातून दीक्षाभूमीच्या समग्र इतिहासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.सदरील पुस्तक सम्यक प्रकाशन दिल्ली कडून प्रकाशित असून हे पुस्तक हिंदीमध्ये उपलब्ध आहे.



*डाँ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक ,दिल्ली*
(आधुनिक व प्राचीन बौद्ध स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
देशाची राजधानी असलेले 'दिल्ली' येथे निर्माण करण्यात आलेले डाँ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक ( 26, अलीपुर रोड ) म्हणजे आधुनिक व प्राचीन बौद्ध स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उदघाटन दिनांक 14 एप्रिल 2018 ला करण्यात आले. खुल्या संविधानाच्या पुस्तकाच्या आकाराचे अतिशय भव्य असे हे स्मारक आधुनिक तंत्रज्ञान व बौद्ध कलेनी युक्त आहे.संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला अंतिम श्वास याच ठिकाणी घेतला होता.त्यामुळे या भूमीचे महत्व व पावित्र्य जाणून सदरील ' महापरिनिर्वाण भूमी'त निर्माण केलेले स्मारक सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर  कायदेमंडळात सदस्य असताना या ठिकाणी निवास करीत होते..बाबासाहेबांनी जीवनाची  शेवटची काही वर्षे याच ठिकाणी व्यतीत केली.याच ठिकणी 6 डिसेंम्बर 1956 ला बाबासाहेबांचे 'महापरिनिर्वाण ' झाले.या स्थळाचे महत्व जाणून , 100 करोड खर्च करून अंदाजे 2 एकर जागेत हे स्मारक असून विविध कला व आधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करून डाँ. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन प्रदर्शित करण्यात आले आहे .स्मारकाच्या समोरच 12 फूट उंच असलेले ब्रॉन्झ धातू निर्मित 'अशोक स्तंभ'प्रतिष्टीत आहे.स्मारकाच्या आत प्रवेश करताच बाबासाहेबांचा भव्य पुतळा , हातात संविधान असलेला, चे दर्शन होते.याच ठिकाणी डिजिटल स्क्रीन , LCD, आडीओ व्हिडीओ प्रोग्राम च्या माध्यमातून डाँ. बाबासाहेबांचे सम्पूर्ण जीवन-दर्शन करण्यात आले आहे.बडोद्यामध्ये अपमानास्पद वागणूक मिळल्यामुळे दुःखी झालेले बाबासाहेब एका झाडाखाली चिंतन करीत बसलेले प्रतिबिंब ( डमी मोडेल) पाहायला मिळते.पुढे काही दुर्मिळ फोटो व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून बाबासाहेबानी निर्माण केलेली चळवळ , प्रदर्शित केलेली आहे.याच ठिकाणी , संविधान सभेत भाषण करत असलेले डाँ. बाबासाहेब दिसतात.हे दृश्य म्हणजे प्रत्यक्ष बाबासाहेब आपल्या समोर बोलत असल्याचा भास होतो.बाजूलाच संविधान सभेतील सदस्य सही करताना दाखवलेले आहे .
तळ मजल्यात प्रवेश करताच , भारतीय संविधानाच्या मूळ प्रतिकृतीचे दर्शन होते. हा मजला म्हणजे ' संविधान गॅलरी'आहे.कारण इथे संपूर्ण संविधान प्रदर्शित केलेले आहे.इथेच बाबासाहेबांच्या काही दुर्मिळ वस्तू बेड , टाईपरायटर , शूज ,,,, इत्यादिचे दर्शन होते.या ठिकाणी अतिशय सुंदर असे 'मेडिटेशन हॉल' निर्माण केलेले असून , मुख्य भागात भगवान बुद्धांची पांढऱ्या शिल्पाने निर्मित अतिशय सुंदर बुद्ध मूर्ती प्रतिस्थापित केलेली आहे. स्मारकाच्या बाहेरील बाजूस भगवान बुद्धांच्या विविध हस्त मुद्रांचे प्रदर्शन केलेले आहे.विविध संगीतमय फवारांचे वापर करून स्मारकाचे बाह्य सौंदर्य मन मोहून जाते.
अश्याप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करून  डाँ. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन दर्शन तथा संघर्ष प्रदर्शित करण्यात आले आहे.
संकलन :- भन्ते धम्मानंद , औरंगाबाद
            :- 9511964256