BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

Sunday, November 24, 2019

*डाँ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक ,दिल्ली*
(आधुनिक व प्राचीन बौद्ध स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
देशाची राजधानी असलेले 'दिल्ली' येथे निर्माण करण्यात आलेले डाँ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक ( 26, अलीपुर रोड ) म्हणजे आधुनिक व प्राचीन बौद्ध स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उदघाटन दिनांक 14 एप्रिल 2018 ला करण्यात आले. खुल्या संविधानाच्या पुस्तकाच्या आकाराचे अतिशय भव्य असे हे स्मारक आधुनिक तंत्रज्ञान व बौद्ध कलेनी युक्त आहे.संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला अंतिम श्वास याच ठिकाणी घेतला होता.त्यामुळे या भूमीचे महत्व व पावित्र्य जाणून सदरील ' महापरिनिर्वाण भूमी'त निर्माण केलेले स्मारक सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर  कायदेमंडळात सदस्य असताना या ठिकाणी निवास करीत होते..बाबासाहेबांनी जीवनाची  शेवटची काही वर्षे याच ठिकाणी व्यतीत केली.याच ठिकणी 6 डिसेंम्बर 1956 ला बाबासाहेबांचे 'महापरिनिर्वाण ' झाले.या स्थळाचे महत्व जाणून , 100 करोड खर्च करून अंदाजे 2 एकर जागेत हे स्मारक असून विविध कला व आधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करून डाँ. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन प्रदर्शित करण्यात आले आहे .स्मारकाच्या समोरच 12 फूट उंच असलेले ब्रॉन्झ धातू निर्मित 'अशोक स्तंभ'प्रतिष्टीत आहे.स्मारकाच्या आत प्रवेश करताच बाबासाहेबांचा भव्य पुतळा , हातात संविधान असलेला, चे दर्शन होते.याच ठिकाणी डिजिटल स्क्रीन , LCD, आडीओ व्हिडीओ प्रोग्राम च्या माध्यमातून डाँ. बाबासाहेबांचे सम्पूर्ण जीवन-दर्शन करण्यात आले आहे.बडोद्यामध्ये अपमानास्पद वागणूक मिळल्यामुळे दुःखी झालेले बाबासाहेब एका झाडाखाली चिंतन करीत बसलेले प्रतिबिंब ( डमी मोडेल) पाहायला मिळते.पुढे काही दुर्मिळ फोटो व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून बाबासाहेबानी निर्माण केलेली चळवळ , प्रदर्शित केलेली आहे.याच ठिकाणी , संविधान सभेत भाषण करत असलेले डाँ. बाबासाहेब दिसतात.हे दृश्य म्हणजे प्रत्यक्ष बाबासाहेब आपल्या समोर बोलत असल्याचा भास होतो.बाजूलाच संविधान सभेतील सदस्य सही करताना दाखवलेले आहे .
तळ मजल्यात प्रवेश करताच , भारतीय संविधानाच्या मूळ प्रतिकृतीचे दर्शन होते. हा मजला म्हणजे ' संविधान गॅलरी'आहे.कारण इथे संपूर्ण संविधान प्रदर्शित केलेले आहे.इथेच बाबासाहेबांच्या काही दुर्मिळ वस्तू बेड , टाईपरायटर , शूज ,,,, इत्यादिचे दर्शन होते.या ठिकाणी अतिशय सुंदर असे 'मेडिटेशन हॉल' निर्माण केलेले असून , मुख्य भागात भगवान बुद्धांची पांढऱ्या शिल्पाने निर्मित अतिशय सुंदर बुद्ध मूर्ती प्रतिस्थापित केलेली आहे. स्मारकाच्या बाहेरील बाजूस भगवान बुद्धांच्या विविध हस्त मुद्रांचे प्रदर्शन केलेले आहे.विविध संगीतमय फवारांचे वापर करून स्मारकाचे बाह्य सौंदर्य मन मोहून जाते.
अश्याप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करून  डाँ. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन दर्शन तथा संघर्ष प्रदर्शित करण्यात आले आहे.
संकलन :- भन्ते धम्मानंद , औरंगाबाद
            :- 9511964256












No comments:

Post a Comment