दीक्षाभूमीचा सर्वांग इतिहास सांगणारे एक महत्वपूर्ण पुस्तक -- """"दीक्षाभूमी"""" लेखक - शांती स्वरूप बौद्ध , दिल्ली।।
दीक्षाभूमीचा भव्य दिव्य स्मारक बघितल्यावर मनाला जितका आनंद मिळतो तेवढाच त्या स्मारकाचा इतिहास सुद्धा अतिशय संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे।। ह्या पुस्तकाच्या द्वारे दीक्षाभूमी स्मारक निर्मितीचा इतिहास सांगण्यात आला आहे।।
अगदी सुरवातीला धम्मदीक्षा समारंभाचा सादांत इतिहास सांगण्यात आलं आहे।।त्यानंतर डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापर्यंतचा इतिहास स्पष्ट करण्यात आला आहे।।पुस्तकाचा किमान अर्धा भाग हा धम्मदीक्षेची पार्श्वभूमी , धम्मदीक्षेचा इतिहास व डाँ।बाबासाहेबांचे महापरिनिर्वानाच्या इतिहासानी व्यापलेला आहे।
पुढील भागात दीक्षाभूमी स्मारकाची पार्श्वभूमी विशद करण्यात आली आहे।या स्मारकासाठी भैयासाहेब आंबेडकर , बै.राजाभाऊ खोब्रागडे , दादासाहेब गायकवाड अश्या अनेक कार्यकर्त्यांना अतिशय संघर्ष करावा लागला। 1961 मध्ये डाँ.सखाराम मेश्राम अध्यक्ष म्हणू व आर आर पाटील सचिव म्हणून एकूण 31 कार्यकर्त्यांची मिळून एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली। नंतर जून 1963 मध्ये, ""परमपूज्य बाबासाहेब डाँ।आंबेडकर स्मारक समिती "" नावानी रजिस्टर करण्यात आली।ह्या वेळी दादासाहेब गायकवाड ह्यांना अध्यक्ष तथा मान.सदानंद फुलझेले ह्यांना सचिव म्हणून निवड करण्यात आली।।( आजपर्यत सदानंद फुलझेले हेच सचिव म्हणून कार्यरत आहे । केवळ रासु गवई यांचे निधन झाल्यामुळे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली )
1961 , तत्कालीन मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण आणि आणि स्मारक समितीतील काही कार्यकर्ते मिळून एक शिष्टमंडळ प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू याना भेटले।।व सर्व विचारविनिमय करून 15 अगस्ट 1961 ला ,स्मारक समितीला एकूण या 14ऐकड जागा हस्तातरीत करण्यात आली।।(1992 च्या विजयादशमीच्या निमित्त तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक ह्यांनी 6 ऐकड जागा दिली। अश्या प्रकारे आज घडीला समितीकडे 20 ऐकड जागा आहे।)
30 मे 1969 ला बुद्ध पौर्णिमेच्या दिनी मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण यांच्या हस्ते दीक्षा भूमी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले।1971 ला दादासाहेब गायकवाड यांचे निधन झाल्यामुळे रासु गवई यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली। ना.ह. कुंभारे ह्यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली।
देशप्रसिद्ध वास्तुशिल्पकार मान. शिवधानमाल ह्यांनी सांची स्तूपाच्या धर्तीवर दीक्षाभूमीचा एक मान चित्र बनविले।व त्यानुसार कामाला सुरुवात झाली।आज जे दीक्षाभूमी स्मारक आपण पाहतो त्याची वास्तुरचना मान. शिवधानमाल ह्यांनी तयार केली आहे।
14 एप्रिल 1991 ला डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म शताब्दी ला स्मारकाचे उदघाटन व्हावे अशी अपेक्सा होती। परंतु ते शक्य झाले नाही।।स्मारक बनायला खूप प्रदीर्घ कालावधी लागला।।18 डिसेंबर 2001 मध्ये राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते स्मारकाचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले.
सध्या दीक्षाभूमी स्मारकाच्या परिसरात भिक्षु निवास , 22 प्रतिज्ञा स्मारक , पवित्र बोधिवृक्ष ,संविधान प्रस्तावना स्मारक इत्यादी स्मारके पाहायला मिळतात.सदरील पुस्तकाच्या माध्यमातून दीक्षाभूमीच्या समग्र इतिहासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.सदरील पुस्तक सम्यक प्रकाशन दिल्ली कडून प्रकाशित असून हे पुस्तक हिंदीमध्ये उपलब्ध आहे.

No comments:
Post a Comment